सेव्ह मेरिटवाल्यांना SC विद्यार्थ्यांची चपराक

By  Veer Bhagwat on 

एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने जाहीर करण्यात आला.

सीईटी सेलने मार्च 2019 मध्ये राज्यातील 100 हुन अधिक केंद्रांवर ही परीक्षा घेतली होती. राज्यभरातून 102851 या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील महाविद्यालयांमध्ये सुमारे 35 हजार जागा आहेत. या जागांवर सीईटीमधील गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. 

'गुणवत्ता' अत्यंत महत्वाचा घटक आणि सध्या माध्यमांमध्ये 'सेव्ह मेरिट' नावाने एक चळवळ उभी राहिली आहे, असं भासवलं जातंय. मेरिट फक्त खुल्या वर्गाची मक्तेदारी आहे असं एक चित्र निर्माण करून आरक्षणावर हल्ला चढवायचा, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. पण या सेव्ह मेरिट वाल्यांना या वर्षी अनुसूचित जाती (SC) अंतर्गत विद्यार्थ्यांनी चांगलीच चपराक हाणली आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी जास्त गुण मिळवून हम भी कुछ कम नही है, हे दाखवून दिलंय. मुंबई मधील अनेक चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी असणाऱ्या कटऑफ लिस्ट मध्ये तर खुल्या वर्गातील(ओपन) विद्यार्थ्यांपेक्षा अनुसूचित जाती(SC) मधील विद्यार्थाना जास्त गुण मिळवावे लागले आहेत. अनेक ठिकाणी ओपनच्या विद्यार्थ्यांना कमी गुण असून प्रवेश मिळाला आहे, परंतु त्या ठिकणी अधिक गुण मिळवून सुद्धा अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. ही सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी सुद्धा मुंबईतील काही कॉलेजची आकडेवारी इथे मांडतो.

प्रवेश मिळण्यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळी मेरिट लिस्ट जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे वेगवेगळ्या विभागातून सीट भरल्या जातात. पुढील आकडेवारी कॉलेज, त्यामधील विभाग आणि विद्यार्थाला मिळालेले गुण अशी आहे.
फादर आग्नेल, वाशी
एस सी 106,
ओपन 102 ते 95,
अल्पसंख्यांक ओपन 97 ते 77
ऑल इंडिया सीट्स 97 ते 77

एस आई इ एस कॉलेज
ओपन 103
एस सी 101
अल्पसंख्यांक 63

विध्यालांकर कॉलेज
ओपन 58
एस सी 89

sydenhyam कॉलेज
एस टी 107
ओपन 99
एस सी 122

आदित्य इन्स्टिट्यूट
ओपन 82 ते 76
एस सी 79
अल्पसंख्यांक 78 ते 57

रहेजा कॉलेज
आर्थिक मागास ओपन 54
ओबीसी 56
एस सी 77

वेलींगकर्स कॉलेज
ओपन 126
एस सी 119
ऑल इंडिया ओपन 99

ही आकडेवारी केवळ उदाहरणा दाखल दिली आहे. राज्यभरात हेच चित्र पहिला मिळेल. जिथे खुल्या वर्गात कमी गुणांना प्रवेश मिळाला आहे तिथे आरक्षित एस सी विद्यार्थ्यांनी अधिक गुण मिळवून देखील प्रवेश मिळत नाही. हे केवळ संधी मिळाल्याचे परिणाम आहेत. गुणवत्ता ही कुणाची मक्तेदारी नाही हे यामुळे अधोरेखित होते.

.........वीर भागवत