राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता का?

By  milind dhumale on 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांनी 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता.त्यांनी त्यासाठी संघचालकत्व बाजूला ठेवून "चलेजाव चळवळ" या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता.आणि हा इतिहास आहे.

अशी कमेंट फेसबुकवर Ram s s असे नाव असणाऱ्या एका युजरने केली आहे.

त्यांना उत्तर देताना,कुणाल शेळके या युजरने "असे कधी वाचनात आले नसल्याचे म्हणले आहे,इतिहास माझा आवडता विषय आहे.आजवरच्या वाचनात अशी गोष्ट वाचनात आली नाही,ही माहिती कोणत्या इतिहासात आहे?" असा प्रश्न त्यांनी Ram s s यांना विचारला आहे.

सोबतच त्यांनी केशव हेडगेवार यांचे 1940 मध्येच निधन झाल्याचे सांगितले आहे.आणि "चलेजाव चळवळ" त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1942 साली सुरु झाली अशी माहिती दिली.

आम्ही ही माहिती तपासून पाहिली.आम्ही विकिपीडिया पाहिले.त्यावर  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांची जन्मतारीख 1 एप्रिल 1889 आणि मृत्यू 21 जून 1940 असा उल्लेख केलेला आहे.

आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र  पाञ्चजन्य वर याबद्दल शोध घेतला असता तीथे सुद्धा दिनांक 05-एप्रिल-2019 च्या एका लेखात हा उल्लेख आलेला आहे.आणि त्यांचा मृत्यू 21 जून 1940 रोजी झाल्याचा उल्लेख केलेला आहे.

या शोधपत्रकारिता लेखासोबत आम्ही सदर माहितीचे स्त्रोत स्क्रीनशॉट जोडत आहोत.

 

1 rss keshav baliram hedgewar bjp 1942 chalejav chale jaaw movement quit india movement.jpg

1 rss keshav baliram hedgewar bjp 1942 chalejav chale jaaw movement quit india movement.jpg

 

05-एप्रिल-2019 रोजी प्रकाशित झालेल्या पाञ्चजन्य लेखातील उल्लेख खालीलप्रमाणे 

1 rss keshav baliram hedgewar bjp 1942 chalejav chale jaaw movement quit india movement.jpg

 

 

आमच्या पडताळणीत हे सिद्ध झाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांनी 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला नव्हता,कारण त्या अगोदरच म्हणजे दोन वर्षे आधीच त्यांचे निधन झाले होते.त्यामुळे Ram s s यांनी इतिहास म्हणून केलेला दावा खोटा ठरला आहे.

Team jaaglya