फेसबुक अकाऊंट सुरक्षित आहे का?

By  Suhas More on 

अत्यंत महत्वाचे -

फेसबुकवर नियमीत ॲक्टिव्ह असलेल्या व्यक्तींचे अकाऊंट व्हायरसग्रस्त कि हॅकरग्रस्त...???

मी सुहास मुकुंद मोरे, फेसबुक मित्र यादीत असलेल्या आणि नसलेल्या सर्वांना सुचित करत आहे.

तुम्ही दररोज फेसबुकवर असाल तर सावध व्हा.

मला आलेल्या अनुभवावरून मी सर्वांना सांगू इच्छितो.
माझ्या नावाने कोणाच्या इनबॉक्स मध्ये वादग्रस्त किंवा अश्लिल मेसेज, व्हिडीओ, इमेजेस असे काहीही आले असेल तर ते मी पाठवलेले नाही.

कोणाच्या वॉलवर माझ्या नावाने काहीही वादग्रस्त अथवा फेसबुक कम्यूनिटी गाईडलाईन क्रॉस करणारे कंटेट पोस्ट झाले असेल तर ते मी केलेले नाही.

कोणाच्या पोस्टवर माझ्या नावाने असभ्य भाषेत कमेंट दिसत असेल ती कमेंट मी केलेली नाही.

मला हा अनुभव आला आहे.
मित्र यादीत नसलेल्या व्यक्तींला माझ्या नावाने मध्यरात्री मेसेज गेले आहेत.
तसेच मेसेंजर मध्ये एका व्यक्तीला व्हिडीओ कॉल गेला आहे.... त्यानंतर त्यांची प्रतिक्रीया गोंधळात टाकणारी होती. मी त्यांना समजावून सांगू शकलो नाही...... खुप शॉकींग आहे हे सर्व.

मी माझे जी मेल, फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर, ट्वीटर सर्व पासवर्ड बदलले.......

तुम्हाला कोणालाही असा अनुभव येऊ शकतो. अकाऊंट हॅक झाले असेल तर हॅकर पासवर्ड बदलू शकतो किंवा तुमच्या डिव्हाइस मध्ये ते पुन्हा लॉग इन होणार नाही असेही करू शकतो.

एखादा व्हायरस किंवा बग असेल तर त्यामुळे असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्हायरसचा हल्ला होऊ नये म्हणून अनोळखी लिंक्सवर क्लिक करण्याचे टाळले पाहीजे. अशा लिंक्स व्हाट्सअप किंवा मेसेंजर मध्ये आपल्याच मित्रांच्या नावाने येऊ शकतात. त्या लिंक्स ओपन केल्यावर पुढे दुसरी लिंक दिसते....तुमच्या डिव्हाईस मध्ये व्हायरस आहे आणि क्लिअर करण्यासाठी हि लिंक ओपन करा...अशी काहीतरी सुचना असू शकते. किंवा तुमचा पासवर्ड प्रोटेक्ट करा असे सांगून डाऊनलोड लिंक दाखवली जाते. ती ओपन करायचा प्रयत्न केल्यास तुमचा डिव्हाइस, जो बरेचदा मोबाईल असतो, रिस्टार्ट होतो....आणि रिस्टार्ट झाल्यावर तुम्हाला ती लिंक वगैरे काहीच दिसत नाही....तेव्हा समजून जायचे, एकतर मोबाईल हॅक झालाय किंवा त्यामध्ये व्हायरसने प्रवेश केलाय!

दुसरी शक्यता म्हणजे आयटी सेल सध्या सरकार विरोधकांवर पाळत ठेऊन आहे.
हॅकर तुमचे अकाऊंट पार्शअली हॅक करू शकतो. ज्यामुळे तुम्ही तुमचे अकाऊंट नेहमीसारखेच वापरत असता त्याच वेळी तुमच्या नावाने तुमच्याच अकाऊंटवरून नको ते उद्योग चालू असतात जे तुम्हाला माहीतच नसतात.

डिजीटल युग आहे...समोरा समोर विचारांची लढाई मोडीत निघतेय...तुम्हाला सोशल मिडीयात तुमच्याच अकाऊंटच्या आधारे बदनाम करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात.

डिजीटल साक्षर होण्याची गरज आहे. नाहीतर नकळत आपण कोणाच्यातरी हातचे बाहूले बनून राहू.

लक्षात ठेवा, मोबाईल आपल्या हातात आहे आपण मोबाईलच्या हातात नाही !!
---- सुहास मुकुंद मोरे

#DigitalIndia
#digitalinfluencer
#bugsandvirus