एक्झिटपोलची पोलखोल

By  milind dhumale on 

 

एक्झिटपोलचा अंदाज अतिशय फसवा आणि सत्ताधाऱ्यांना निव्वळ फायदा पोहोचवण्यासाठीच असतो.राज्यातील प्रसारमाध्यमे बेजबाबदारपणे वागत असून ही पत्रकारिता बीयोंड द एथिक्स आहे. नैतिकता नावाची चीज शिल्लक उरलेली नाही अशी ही परिस्थिती आहे.
आणि यावर कुणी लगाम लावणारे उरलेलं नाही.हे आणखी दुर्दैवी.

प्रसारमाध्यमे किंवा इतर संस्थाना एक्झिटपोलचे आकडे देणारे सोर्स कोणते? त्यांना निवडणूक आयोग ही माहिती देते का? की उमदेवार देतात?

वा त्यांचे प्रतिनिधी प्रत्येक मतदार संघातील बूथला भेट देवून माहिती जाणून घेतात आणि हा सर्व डाटा वृत्तवाहिनीला दिला जातो?

या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत.यापैकी काहीही होत नाही.
आणि असं होणंच मुळात लॉजिकल नाहीये.अशक्य आहे.का ते बघा.

लोकसभेला आम्ही दक्षिण मध्य मुंबईत काम पाहिलं आहे.साधारण गोष्ट अशी की कोणत्या मतदार संघात कुणाच्या बाजूने काय कल आहे.हे समजायला तुमच्याकडे प्रत्येक बूथवाईज मतदारांची यादी असावी लागते.

या मतदारयादीशिवाय कोणत्या मतदार संघात कुणाच्या बाजूने काय कल आहे हे खुद्द निवडणूक आयोग अधिकारी व अध्यक्ष देखिल शपथेवर सांगू शकत नाही.हे अगोदर नीट समजून घेतलं पाहिजे.

हि मतदारांची यादी तुम्हाला सहावाजेपर्यंत मिळणे शक्य नाही.याशिवाय या सर्व बूथवाईज याद्या एकत्रित करणे.त्यांचे मतदार संघ वाईज सोर्टींग करणे आणि त्यातून एक डाटा मिळवणे गरजेचे असते.

दुसरा मुद्दा हा डाटा कसा काढला जातो? तर कोणत्या बूथला किती लोकांनी भेट दिली.आणि स्लीप घेतली हा तो आकडा आहे.आता इथे एक मुद्दा आणखी वेगळा असा जो की काल मांडला होता.तुमच्या बूथला मतदारांनी भेट दिली स्लीप घेतली तर जरुरी नाही की त्याने तुमच्याच उमेदवाराला मतदान केले आहे.त्यामुळे हा एक हायपोथेसिस आहे.

तिसरा मुद्दा ग्राफिक्स बनवणे त्यांचे कल दाखवणे तेही विभागवार हे तासाभरात शक्य नाही.ही सगळी कामे केल्याचा अनुभव गाठीशी आहे.यामुळे सांगू शकतो की हे निव्वळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे सुरु आहे.

सहा वाजता शेवटचं मतदान होतं आणि सहा वाजता वृत्तवाहिन्या केकाटायला सुरुवात होते.ग्राफिक्स आदळू लागतात.आणि पुन्हा त्यांना हवं आहे त्या पक्षांच्या बाजूचे कल दाखवायला सुरुवात होते.

हे सगळं जर विश्वासार्ह असेल तर त्यासाठी दोनच गोष्टी घडू शकतात एक पहिली ही की प्रसारमाध्यमांची समांतर निवडून यंत्रणा आहे.आणि त्यांच्याकडे प्रत्येक मताचा डाटा चुटकी वाजवल्या सरशी एका क्लिकवर मिळू शकतो.

अथवा दुसरी गोष्ट निवडणूक आयोग ईव्हीएम मशिन्स मध्ये सुरक्षित झालेली आकडेवारी या प्रसारमाध्यमाना पुरवतो.मला वाटतं या दोन्ही गोष्टी अशक्य आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी आणि निवडून आयोग आणखी अडचणीत येवू शकतो.त्यामुळे हे होणे शक्य नाही.

मध्यंतरी कोब्रापोस्टने प्रसारमाध्यमांचे स्टिंग ऑपरेशन करून मतांचा कौल एक्झिटपोल संदर्भात हवी ती आकडेवारी हवी तशी दाखवण्यासाठी हे लोक काय करू शकतात आणि कोणत्या पातळीवर घसरू शकतात हे दाखवून दिले होते.त्यामुळे वरील मुद्दे जर आपण नीट शांतपणे लक्षात घेतले तर असं लक्षात येईल की मतदारांचा कौल असा इन्सस्टंटली कुणीच दाखवू शकत नाही.ना एक्झिटपोल दाखवू शकतो.

त्यामुळे हे सर्व फक्त सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा म्हणून दाखवलं जातं.आता यामागे काय लॉजिक आहे? तर दोन दिवस निवडणूक आयोगाने घेतलेला वेळ हा यातील महत्वाचा मुद्दा आहे.

या दोन दिवसात काहीही होऊ शकतं.आणि निकाल फिरले की त्यासाठी तुमच्या मेंदूवर अगोदरच एक्झिटपोलची आकडेवारी आदळलेली असते आणि सांगितलेलं असतं की निकाल असेच लागणार आहेत.

अन तसेच लावले जातात आणि त्यावर संशय घेतला जात नाही.
यावेळी मताधीकाराची टक्केवारी घसरली असून पाच वाजेपर्यंत 54.53% ही आकडेवारी शेवटी सहा वाजता 55.31% पर्यंत जाऊ शकली.म्हणजे तासाभरात फक्त 0.78% एवढाच फरक पडला आहे.

आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत जीथे 63.38% एवढी आकडेवारी असताना या विधानसभेला 8.85% एवढे मतदान कमी झाल्याचा निष्कर्ष काढता येतो.याचा सर्वात जास्त फटका हा सत्ताधारी पक्षाला बसायला हवा.मात्र एक्झिटपोलमध्ये मनमानी करून वाट्टेल ती आकडेवारी घुसडून एक वातावरण तयार केले जात आहे.

या प्रसारमाध्यमांना आव्हान आहे.तुमचे एक्झिटपोलचे सोर्स डाटा जनतेसाठी ओपन करा.दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाईल.

- मिलिंद धुमाळे