कंत्राटी कामगार भरती

By  Vishal Bhingare on 

 

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत हा असंख्य तरुणांचा देश आहे असा नेहमीच म्हंटले जाते परंतु मागील काही वर्षापासून हा तरुणांचा देश आता मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांच्या देश होत चालला आहे याला जबाबदार कोण हा मुळात प्रश्नच नाही .त्यात महाराष्ट्र सारख्या सधन राज्यात रोजगार संधी भरपूर प्रमाणात मिळते असे म्हटले जाते परंतु प्रत्येक्षात असे नाही. लोकांची मत घेऊन निवडून आलेल्या लोकप्रिनिधींनी कडून सरकार चालवले जाते आणि आणि खरी समस्या इथूनच सुरू होते (लोक प्रतिनिधी यावर फार कमी वेळेस सभागृहात भाष्य करतात)

स्पर्धा परीक्षा आणि नोकरी आणि त्यातून मिळणारा मानसन्मान हा महाराष्ट्रातील तमाम तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आजही तरुणांचे लोंढे या शेत्राकडे वळत आहे यातील काही जण यशस्वी होतातही आणि बहुसंख्य तरुण यातून सपशेल वगळले जातात हे वास्तव आपण नाकारू शकत नाही पण प्रश्न असा पडतो की हे असे का होते ? का राज्यकर्त्या सरकार ला याची जाणीव नाही की ते मुद्दाम याकडे कानाडोळा करत असतात . तस पाहिलं तर स्पर्धा परीक्षा ही वेगवेगळ्या पदांसाठी होते यात सर्वात मोठं आकर्षण अधिकारी होण्याचं असता आणि यातूनच सर्व तरुण,पालक, राज्यकर्ते सरकार ई. याकडे विशेष लक्ष वेधून घेतात परंतु याच स्पर्धेत इतरही वर्ग ३आणि वर्ग ४ या पदासाठी आणि त्याचा जीवापाड मेहनत घेणारी तरुण पिढी तयार झाली आहे आणि हा वर्ग अधिकारी यांच्या संख्येने भरपूर प्रमाणात मोठा आहे आणि त्यातूनच इथे स्पर्धा ही त्याच प्रमाणात आहे परंतु सरकार जे निर्णय घेते ते लोकांच्या भल्यासाठी असतेच असे म्हणता येत नाही पण तरीही सर्वसामान्य तरुण याला बळी पडतात किंबहुना सर्वच लोक याला बळी पडतात. याचेच उदाहरण सांगायचे म्हणजे पेट्रोलचे दर कमी झाले की पेट्रोल पंपावर होणारी गर्दी, सरकारने रेपो रेट कमी केले की बँकांकडे कर्जप्रकरणाची होणारी वाढ, आणि आणखी सांगायचं झालं तर निवडणूक काळात जनतेसाठी केलेला मॅनिफेस्टो मग त्यात कोणी १५ लाख देईल,कोणी कर्ज माफी तर कोणी बेरोजगारी भत्ता परंतु प्रत्येक्षात असे होईल याची खात्री वाटत नाही आणि अश्याच प्रकारे सगळ्याची फसगत होते  .मागील काही वर्षांपासून बेरोजगारांचा प्रश्न वाढतच आहे सरकारी नोकरीतील वर्ग ३आणि ४ चा जागा मात्र त्या तुलनेत दरसाल कमीच होत आहे . आणि काही परीक्षा तर विना आदेश बंद करून टाकल्या आहेत की काय अशी शंका येते जसे की जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदे भरण्यात येतात त्यात कृषी सहायक, विस्तार अधिकारी, शिक्षण अधिकारी, ग्रामसेवक, लिपिक , परिचर ई पदे भरतात .महाराष्ट्रात मागील पाच वर्षात ही पदे भरण्यात आली नाही आणि सरकारला ती भरण्यात कुठलाही रस नाही असे दिसते आहे. आता फक्त वर्ग ३ ,४ पदासाठी अभ्यास करणाऱ्या तरुणांनी काय करावं हाच यक्षप्रश्न आहे . आता वर्ग ३,व ४ ची परीक्षेची वाट बघणारा युवक हा सधन कुटुंबातील नसतो हे वास्तव आहे आणि तो या परीक्षेची ५-६वर्ष वाट बघू शकत नाही आणि जरीही नौकरी मिळाली तरीही तो की मोठा करोड पती होईल असं ही नाही पण सरकार मग अशा जागा का भरत नाही तर याच अनेक कारणे देता येतील यातलं एक म्हणजे outsourcing माध्यमातून भरून घेत आहे आणि यातून काही मोजक्याच लोकांना फायदा होतो तसेच आता तर सर्वच रिक्त पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतात आणि यांची पद्धत तर ब्रिटिश सरकार पेक्षा जुलमी असते या मध्ये तुम्ही नोकरी वर पर्मनंट होण्याची शक्यता नसतेच तुम्ही न्यायालयात गेलात तरीही तुम्हाला दाद मिळत नाही हे वास्तव आहे .

 

विशाल भिंगारे Jaaglya.com